स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; कार मधून 7 लाखाचा गुटखा जप्त

बीड — शहरातील फुलाई नगर परिसरात अवैधरित्या गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत एका स्वीफ्ट कारमधून विविध कंपनींचा गुटखा जप्त केला. या कारवाईत एकूण ६ लाख ६८ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षकांच्या आदेशा नुसार स्थानिक गुन्हे शाखा अवैध धंद्यावर कारवाई करत आहे. शहरातील फुलाईनगर भागात गुटखा येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यानंतर फुलाईनगर येथे एक स्वीफ्ट कार क्र. एम एच -४३आर-५७२५ मधून विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आणला जात असतांना कारवाई करण्यात आली.

85 लाखाच्या अपहार प्रकरणी खोकरमोहाचे सरपंच श्रीहरी मिसाळ वर अपात्रतेची कारवाई

आज दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कारची तपासणी केली. तपासणी दरम्यान कारमध्ये विविध कंपनींच्या गुटख्याचा साठा आढळून आला. यामध्ये एकूण ६ लाख ६८ हजार १८४ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भाऊसाहेब राम पडुळे वय ३४ वर्ष, रा. औरंगपूर ता. बीड, ह.मु.स्वर्णनगरी, फुलाईनगर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान हा गुटखा त्याने रेवन्नाथ चादर रा. भाटसांगवी, ता. बीड याच्याकडून घेवून आल्याचे समोर आले. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात दोन्हीही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भाऊसाहेब पडुळे यास ताब्यात घेतले असून रेवन्नाथ चादर हा फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनखाली पोउपनिरीक्षक श्रीराम खडावकर, पो.ह. राहुल शिंदे, युनुस बागवान, महिला पोलीस कर्मचारी स्वाती मुंडे, पोलीस अंमलदार अशफाक सय्यद, पो.अं मनोज परजणे व चालक पोलीस नितीन वडमारे यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles