बीड — सावकारी जाचाला शेतकऱ्यानंतर आता व्यापारी बळी पडला आहे.
सावकाराच्या त्रासाला कंटाळून चक्क पाटोद्याच्या एका व्यापाऱ्यानेच आपलं जीवन संपवल्याची घटना . आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी एका व्यापाऱ्याने खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले.त्या कर्जाची सहा पटीने परतफेड सुद्धा केली. मात्र सावकराला आणखी पैसे हवे होते. त्यामुळे सावकार व्यापाऱ्याला दमदाटी आणि धमक्या देत होता. सावकाराचा जाच सहन करण्यापलीकडे गेल्याने व्यापाऱ्यानं आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी व्यापाऱ्यानं बीडचे पोली अधीक्षक नवनीत काँवत यांना चिठ्ठी लिहिली. त्यानंतर व्यापाऱ्यानं गळफास घेतला. संजय कांकरिया, असं आत्महत्या करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे. संजय कांकरिया यांनी एका खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान व्यापाऱ्याच्या आत्महत्येमुळे बीड जिल्ह्यातील खळबळ उडालीय.
व्यापाऱ्यानं आत्महत्या करण्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. आर्थिक विवंचनेतून त्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. कर्जाची सहा पट रक्कम सुद्धा त्यांनी परतफेड देखील केली. मात्र सावकारांची नजर त्यांच्या जमिनीवर होती. त्यामुळे आणखीन पैसे हवे असल्यानं सावकार कांकरिया यांच्यामागे पैसाचा तगादा लावत होता.पैसे दिले नाही तर चटके देऊन तुझ्यासह तुझ्या कुटुंबाला जिवंत मारू, अशी धमकी दिली होती.या धमकीमूळे व होणाऱी मानसिक छळवणूक संजय कांकरिया यांना सहन झाली नाही. वाढलेला जाच पाहून कांकरिया यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनाच चिठ्ठी लिहीली. मी किती वेळा फिरलो, तरी न्याय मिळत नाही. माझ्या मरणाला जबाबदार कोण?” अशा शब्दांत व्यापाऱ्याने आपली निराशा व्यक्त केली. शेवटी
शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.संजय कांकरिया यांनी अमृत भोसले आणि दीपक साळुंके या दोघांकडून व्याजाने पैसे घेतले होते. कांकरिया यांनी या दोघांना सहा पट पैसे परत केले होते, तरीही यांनी पैशाचा तगादा लावला. चटके देऊन जीवे मारण्याची धमकी अमृत भोसले आणि दीपक साळुंके यांनी संजय कांकरिया यांना दिली होती. त्यानंतर संजय कांकरिया यांनी आत्महत्या केली.या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अमृत भोसले, दीपक साळुंके या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले आहे.

