सातवीतल्या मुलीचं जबरदस्ती लग्न; आईचेच जावयाशी अनैतिक संबंध

धारूर — एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. सातवी इयत्तेतील एका अल्पवयीन मुलीचे घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावले. त्यानंतर मुलीच्या आईने आपल्या जावयासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि मुलीवर मानसिक तसेच शारीरिक त्रास सुरू केला.
पीडित मुलीने 2022 मध्ये आजी-आजोबांच्या घराकडे पळून जाऊन स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित केली. नंतर तिने मानवसेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. या माहितीच्या आधारे धारूर पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि तब्बल चार वर्षांनी गुन्हा नोंदवण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिच्या दोन लहान बहिणी आईसोबत राहत होत्या. 2016 मध्ये त्यांचे वडील घर सोडून गेले होते. 2017 मध्ये मुलगी सातवी इयत्तेत शिकत असताना तिच्या आईने गावातील एका तरुणासोबत तिचे लग्न धारूरमधील एका मंदिरात लावले. मुलीची इच्छा न विचारता आई, सासू, मावशी, चुलतदीर, चुलतसासरा आणि चुलतसासू यांनीही तिच्या विरोधात लग्न लावून दिले, असे तक्रारीत नमूद आहे. लग्नानंतर काही दिवसांनी मुलीस तिच्या नवऱ्याच्या घरी पाठवले गेले, जिथे तिच्या इच्छेविरुद्ध पतीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने हे आई व सासूस सांगितले असता, त्यांच्याकडूनही बळजबरी सुरू ठेवण्यात आली.मुलीने पाहिले की तिच्या आईने स्वतःच्या पतीसोबत अनैतिक संबंध ठेवले आहेत, ज्यामुळे तिला मानसिक त्रास होऊ लागला. पती आणि आई दोघे मिळून तिला सतत त्रास देऊ लागले. पीडित मुलीने अंबाजोगाई येथे मानवसेवाभावी संस्थेच्या अधिकाऱ्यांना, अरुंधती पाटील यांना सर्व प्रकार सांगितला. या माहितीच्या आधारे प्रकरण उजेडात आले आणि धारूर पोलिसांनी तपास सुरू केला.

धारूर पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची तातडीने अटक करून पुढील तपास सुरू आहे. ही घटना अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles