मुंबई — आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या आंदोलनास पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता उद्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे.मात्र, मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. त्यातच, जरांगे यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलीस Mumbai policeदलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन 1 दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला.
मनोज जरांगे पाटील 7 वाजता पत्रकार परिषद press conference घेतली असून, आझाद मैदानात Azad maidan सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आव्हानाला ही मनोज जरांगे पाटील उत्तर दिलं आहे.
यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, सरकारने आता असले डाव खेळू नये आरक्षण द्यावे. आम्ही गोरगरीब मराठ्यांना आरक्षण Maratha reservation मिळाले तर आम्ही तुम्हाला विसरणार नाही. तुम्ही एक एक दिवस मुदत वाढ दिली तरी उपोषण मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरू राहील.
सिद्ध झालं परवानगी सरकार देऊ शकते. मला गोळी मारण्याचे, लोक अडवायचे सगळे सरकारच्या हातात आहे. आमच्या टॉयलेट्सला लॉक लावले आहे बाहेरचे चहाचे हॉटेल्स ही बंद आहेत. प्यायला पाणी नाही, जेवायला नाही, तुम्ही तर इंग्रजा पेक्षा बेकार झालेत. असं ते म्हणाले.
मला सरकारने काय केलं हे माहिती नाही. त्यांनी काल मला आंदोनलाची परवानगी दिली होती. आज पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. माझं एक मत आहे की असले भंगार खेळ खेळण्यापेक्षा खरा डाव खेळावा. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकावे. त्यांनी मराठा समाजाचे मन जिंकणे गरजेचे आहे.
मराठा समाजाचे मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे. गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण दिले तर मरेपर्यंत मराठा समाज या सरकारला विसरणार नाही. एक-एक दिवस मदुतवाढ देण्यापेक्षा थेट आरक्षण देऊन टाकावे, असे मत जरांगे यांनी व्यक्त केले.
नाटक का खेळले जात आहे. आंदोलनास परवानगी देणे सरकारच्या हातात आहे. मला गोळ्या घालून मारणेही सरकारच्याच हातात आहे. पोरांना अडवायचं का सोडायचं हेही सरकारच्याच हातात आहे. मराठा समाजाच्या मुलांना त्रास न दिल्यास तेही काहीच करणार नाहीत.
मराठा समाजाच्या मुलांना लघवी करण्याचीही सोय नाही. वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत. पाणी प्यायचीही सोय नाही. मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे. तुम्ही इंग्रजांपेक्षाही क्रूर झाले आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.

