Sunday, December 14, 2025

संस्थाचालकांच्या मनमानीचा बुरखा फाटला; शिक्षकाची भावनिक पोस्ट लिहून आत्महत्या

बीड — एका शिक्षकाने भावनिक पोस्ट लिहून टोकाचे पाऊल टाकले आहे. बीड शहरातील कृष्णा अर्बन बॅंकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. यामुळे विक्रम मुंडे या संस्थाचालकाचा हैवानी चेहरा समोर आला आहे.
जीवन संपविण्यापुर्वी या शिक्षिकाने एक फेसबुक पोस्ट करत त्यात काही व्यक्तींची नावे देखील लिहिली आहेत. या घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर एकच संताप व्यक्त केला जाऊ लागला आहे
आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचे नाव धनंजय अभिमान नागरगोजे असून ते १८ वर्षांपासून विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. तेव्हापासून त्यांना वेतन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी शाळेच्या संचालकांवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या छळाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

धनंजय नागरगोजे यांनी आपल्या मुलीला उद्देशून लिहिलेले पत्र.. जशाच्या तसं..

श्रावणी बाळा..! तुझ्या बापूला शक्य झालंच तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळा. तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पहितली होती. पण त्या स्वणाना स्वप्नातच ग्रहण लागले काय करू ? माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही. कधी मी कुणाला दोन रूपयाला फसवल नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतल नाही . श्रावणी बाळा शक्य झालंच तर कर एकदा तुझ्या बापूला माफ कर. कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे. तुला आजुन काही कळत नाही, तुझ वय आहेच किती, तीन वर्षे तुला काय कळणार. ज्यांना कळायला पाहिजे. त्यांना बापू कधी कळला नाही.

बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही. सर्वांसोबत चांगला वागला. पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे. विक्रम बाबुराव मुंडे, विजय विक्रम मुंडे, अतूल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्य करते उमेश रमेश मुंडे, गोविंद नवनाथ आव्हाड, ज्ञानेश्र्वर राजेभाऊ मुरकुटे, या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे. मला हे हाल हाल करून मरणार आहेत. मला मारण्याचं करणं म्हणजे मी फक्त विचारलं होत की ,मी तुमच्या शाळेवर गेली. 18 वर्षे झालं काम करतोय. अजून मला पगार नाही
आता पुढे काय करायचं ? त्यावर विक्रम बप्पा म्हणाले, तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा. हे एकूण माझ्या पाया खालची जमीनच सरकली आणि ती तून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सूर्वात केली. श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत. या राक्षसा मुळेच मी तुझ्या पासून दूर जात आहे. तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती. पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो. काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही .

बाळा डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पण त्याग केल्याशिवाय पर्याय नाही. श्रावणी मला माफ कर माफी मागण्याच्या पण लयकीचा नाही मी तरी पण शक्य झालं जेव्हा तुला कळेल तेंव्हा माफ कर. आता मी थांबतो. खूप त्रास होतोय मला . विक्रम बाबुराव मुंडे. विजयकांत विक्रम मुंडे. अतूल विक्रम मुंडे. उमेश रमेश मुंडे. ज्ञानेश्वर राजेभाउ मुरकुटे गोविंद (अमोल) नवनाथ आव्हाड. हे सर्व मझ्या माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत .कारण यांनी मला खूप त्रास दिला आहे. यांच्या मुळेच मी माझे जीवन संपवित आहे. आत्ता पर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनानी माफ करावे. सर्वांना माझा शेवटचा राम राम.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles