Home जिल्हा शेतकऱ्यांनो पा”ठका”च्या अविनाशी सत्या नाशापासून सावध व्हा! पवन ऊर्जा सौरऊर्जा कंपन्यांकडून ताकद...

शेतकऱ्यांनो पा”ठका”च्या अविनाशी सत्या नाशापासून सावध व्हा! पवन ऊर्जा सौरऊर्जा कंपन्यांकडून ताकद दाखवून मावेजा घ्या..! ✒️ भाग -1

0
28

बीड — जिल्हाधिकारी म्हणून शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेण्याची जबाबदारी टाळत पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांचे “बटीक”बनून काम करण सध्या सुरू आहे. शेतकऱ्यांचा “अविनाशी” सत्यानाश करण्याचा विडा उचललेल्या (पा)ठका पासून सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांकडे गावगुंडांना, पोलीस यंत्रणेला, महसूल यंत्रणेला इतकंच नाही तर सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधी सह अधिकाऱ्यांना पाय चाटायला लावण्या इतका द्यायला पैसा आहे. पण शेतकऱ्यांना देताना शेतकऱ्यांना देताना हाताला मात्र महारोग झाल्यासारखी स्थिती आहे. शेतकऱ्यांनो सावध व्हा…! जिल्हाधिकारी आपली आर्त हाक ऐकेल न्याय देईल ही अपेक्षा बाजूला ठेवा. गाव पातळीवर संघटित होऊन प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा जास्तीत जास्त मावेजा कसा पदरात पडेल यासाठी पारदर्शक विश्वासाच वातावरण तयार करा असं म्हणण्याची वेळ आली आहे.
पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांनी बीड जिल्ह्यात शेतकऱ्या विरोधात धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे शासनाच्या उद्योग ऊर्जा विभागाने 21 ऑक्टोबर 2023 रोजी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय स नियंत्रण समिती स्थापन करून पवन ऊर्जा कंपन्यांबाबत असलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासून जमिनीच्या व्यवहारात योग्य मोबदला देण्यासाठी योग्य नियोजन लावण्याची जबाबदारी दिली होती. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर पोलीस अधीक्षक सदस्य आहेत. मात्र ही स नियंत्रण समिती कागदावरच राहिली. सध्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का? असा प्रश्न विचारावा लागतो आहे हे दुर्दैव आहे. कंपन्यांची पाय चाटणे, लाळ घोटण हे आपलं कर्तव्य आहे असं समजून सगळा कारभार सुरू आहे. यामध्ये मात्र शेतकरी वर्ग भरडला जात आहे.
पवन ऊर्जा कंपन्यांनी ज्या ज्या गावांमध्ये पाय ठेवला त्या गावांमधील गावगुंडांना आधी हाताशी धरलं त्यांना टॉवर लाईन साठी रनिंग मीटर प्रमाणे पैसा ठरला. त्यांनी स्वतःच्या ताकतीचा वापर करून अनेक ठिकाणी काम करून घेतली. रनिंग मीटर प्रमाणे पैसा ठरल्यामुळे जास्तीत जास्त मोबदला आपल्या खिशात यावा यासाठी अनेकांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसली. गावात पदार्पण करताना ग्रामपंचायत ची ना हरकत घेण्याची गरज सुद्धा कंपन्यांना पडली नाही. गावोगाव फूट पाडा आपलं इप्सीत साध्य करून घ्या एवढीच इंग्रजांच्या पैदाईशीची शिकवण कंपन्यांनी अंगीकारली. कठपुतली बाहुली झालेल्या जिल्हाधिकारी अविनाश पाठक नावाच्या व्यक्तिमत्त्वाने त्याला साथ दिली. गुंडांच्या टोळ्या पोलीस संरक्षणात शेतकऱ्यांच्या शेतात धुमाकूळ घालू लागल्या. एखादा शेतकरी काम करत असताना आडवा आलाच तर त्याला बाजूला घ्यायचं दहा पाच लाखाचं माप त्याच्या पदरात टाकायचं. आम्ही तुला इतका पैसा दिला हे गावात कोणाला कळू देऊ नको हे सांगत फुटीची पेरणी केली. परिणामी गोर गरिबी शेतकऱ्यावर देखील अन्याय झाला. कोणाला किती मोबदला मिळाला याची माहिती शेतकऱ्यांना मिळालीच नाही. जसा शेतकरी तावडीत सापडेल तसा त्याचा चुराडा करायचा ही भूमिका कंपन्यांनी ठेवली. शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला सामाजिक कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांनी वाचा फोडली. पण जिल्हाधिकाऱ्यांनी ‌ जनाची ही नाही मनाची ही नाही खुर्चीची तर नाहीच नाही अख्खी लाजच सोडली. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणं अवघड होऊन बसला आहे. शेतकऱ्यांनो आता तरी गाव पातळीवर संघटित व्हा प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा सगळ्यांना कंपन्यांकडून जास्तीत जास्त मावेजा कसा मिळेल याचा विचार करा. नाहीतर तुमच्यातली दूही, भांडण कंपन्यांच्या फायद्याची आहे. गिधाड तुमची लचके तोडायला टपलेली आहेत याचा विचार करा. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत कर्तव्यदक्ष आहेत. जनमानसावर होणाऱ्या अन्यायाची त्यांना जाण आहे. पवन चक्की कंपन्यांसोबत पोलिसांचा फौजफाटा असला. तरी शेतकऱ्यांनी कंपन्यांच्या लोकांना इजा पोहोचवू नये शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी आहे. हे लक्षात ठेवा अनेक वेळा संरक्षणाच्या मुद्द्यावरून पोलीस अधीक्षकांची व जिल्हाधिकाऱ्यांची तू तु मै मै झाल्याची माहिती मिळत असली. तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करण्याची मजबुरी पोलीस अधीक्षकांची झाली आहे ही बाब लक्षात घ्या.
शेतकऱ्यांचा घास घेणाऱ्या लचके तोडणाऱ्या कंपन्या विरोधात दंड थोपटून रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. व्यवस्थित मोबदला कंपन्यांनी दिला तर त्यांचं स्वागत करा पण कुणावर अन्याय करीत असतील तर संघटितपणे लढा देण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय व्यवस्था सद्यस्थितीत विस्कळीत झाली आहे. नव्या क्रांतीची गरज शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे कारण (पा) ठकच कंपन्यांचे पाय सध्या चाटतो आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here