बीड — छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहास प्रत्येकालाच रोमांचित करतो. प्रत्येक ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली जाते मात्र बीडचा महोत्सव वेगळीच छाप पाडून जातो.निर्भय वातावरणामुळे महिलांचा वाढता सहभाग आधुनिक जिजाऊंना घडवणारा ठरू लागला आहे. शिवरायांची शिकवण यातून “आई” च्या विद्यापीठातून पुढच्या पिढीला मिळणार आहे. भरकटलेल्या समाज व्यवस्थेत क्षीर “सागरा”तला (सं) दीप सुराज्याकडे नेणारा स्तंभच ठरणार आहे.

शौर्य,पराक्रम, त्याग संस्कार यासारख्या अनेकविध गुण लक्षणांची खाण असलेले नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज…! आजही त्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी प्रत्येकाचं रक्त सळसळतं इतकी महाराजांच्या नावात ताकद आहे. त्यांच्या शौर्य पराक्रमाची यशोगाथा घराघरात गायली जात असली तरी आधुनिकतेच्या रगाड्यात त्यांची शिकवण विसरली जाऊ लागली. त्यातूनच अन्यायविरुद्ध लढण्याची धमक कमी होऊ लागली. दरवर्षी शिवजयंती साजरी केली जात असली तरी मध्यंतरीच्या काळात ती युवा वर्ग ,पुरुष यांच्यापर्यंत मर्यादित राहिली गेली. त्यातून हिडीस प्रदर्शन होऊ लागलं. महिलांचा सहभाग नसल्यात जमा झाला. महाराजांचा इतिहास महिलांपर्यंत पोहोचला तरच आधुनिक पिढी काही प्रमाणात का होईना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार वागेल ही बाब विसरली गेली. हे वास्तव नाकारून चालणार नाही.
मात्र संघटित समाज निर्मिती व्हावी या उद्देशाने शिवजयंती उत्सवाला सुरुवात झाली. त्याचा फायदा इंग्रजा विरुद्ध लढण्यासाठी उपयोगी पडला. हीच प्रेरणा घेऊन आधुनिक समाज व्यवस्थेत जिजाऊंच्या माध्यमातून शिवबा राजेंच्या संस्काराचे बीज पेरण्याचं काम संदीप क्षीरसागर या युवकांने हाती घेतलं. सगळ्यात मोठं पाऊल त्यांनी उचलत शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढवण्याकडे लक्ष दिलं. शिवजयंती महोत्सवात महिलांचा सहभाग वाढला तरच मुलांना शिकवण देणारी “आई” महाराजांचा इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचवेल. या बीज पेरणीतूनच आधुनिकतेत समाज व्यवस्थेची बिघडलेली घडी पुन्हा बसवण्यात यश मिळणार याची खात्री बाळगली. त्यासाठी आधी शिवजयंती महोत्सव काळात निर्भयतेच वातावरण निर्माण केलं गेलं.महिलांसाठी वेगळी व्यवस्था करून कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली. “पर स्त्री मातेसमान”हे महाराजांचं ब्रीद आपोआपच अंगीकारला जाऊ लागलं.
महिला भगिनींचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांच आयोजन केलं. त्यामुळे अबालवृद्धांसह महिलांचा सहभाग इतका वाढला की बीडच्या शिवजयंती महोत्सवाला कुंभमेळ्याचं स्वरूप आलं गेलं. या कुंभमेळ्यात प्रत्येक जण शिवबांच्या विचाराचं स्नान करून कृतकृत्य होऊ लागला आहे. त्यामुळेच बीडच्या समाज व्यवस्थेची विण घट्ट करण्यात (क्षीर)सागरातला (सं) “दीप” दिशादर्शक दीपस्तंभ म्हणून काम करताना दिसू लागला आहे

