वृद्ध महीलेस लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बीड — केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील वृद्ध महिला पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेली असताना तिच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याची घटना 18 जून 2025 रोजी घडली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
मालनबाई तुकाराम लाड, वय 80. रा लाडेवडगांव ता. केज या पत्राचे शेडमध्ये रात्री एकट्याच झोपलेल्या असताना अनोळखी चार चोरट्यांनी त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश केला. त्याच्या अंगावरील सोन्याचे दागीने कानातील फुले चोरुन घेवुन गेले होते. याप्रकरणी युसुफ वडगांव पोलीस ठाण्यात कलम 309 (6) भा.न्या. संहीताप्रमाणे दिनांक 18 जून 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि महेश विघ्ने यांचे पथक सदरील गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदरील गुन्हा हा श्याम अजिनाथ शिंदे रा मांडवा ता वाशी जि.धाराशिव याने त्याचे साथीदाराचे मदतीने केल्याचे गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषण व्दारे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचे मागावर होते. दरम्यान 20 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा केज येथील बसस्टॅन्ड वर येणार आहे. माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ केज येथे जावुन बसस्थानक परीसरात सापळा लावला. आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा बसमधुन खाली उतरत असताना पथकाने गराडा घालुन त्याला पकडले, त्यास गुन्हयासंदर्भाने विचारपुस करता त्याने सदरील गुन्हा त्याचे साथीदार विशाल अजिनाथ शिंदे, रा मांडवा ता. वाशी, अमोल नाना शिंदे, रमेश नाना काळे दोन्ही रा कन्हेरवाडी, पारधी वस्ती वाशी, जि. धाराशिव यांनी मिळून केल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातुन चोरीस गेलेले 09 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीणे हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले असुन आरोपी सध्या कोठडीत आहे.हि कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिद्र शेंडगे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, दिपक खांडेकर, भागवत शेलार, पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles