बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान आज कोर्टात सुनावणी पार पडली. सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तिवाद पार पडला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी, असे उज्वल निकम यांनी कोर्टाला सांगितले. दरम्यान वाल्मीक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सरकारी पक्षाने अजून डिजिटल पुरावे सादर झाले नसल्याचे वाल्मीक कराडच्या वकिलांनी सांगितले. यावर आता 17 जून रोजी कोर्टात पूढील सुनावणी होणार आहे. आज कोर्टात जवळपास एक तास सुनावणी पार पडली. आज डिस्चार्ज अर्जावर सुनावणी होणे अपेक्षित होते, त्यावर आज सुनावणी झाली नसल्याचे समजते आहे. आज किरकोळ अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले गेले.
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मीक कराडचा हात असल्याचा आरोप आहे.वाल्मीक कराडला मकोला लागू होणार की नाही हे 17 जूनच्या सुनावणीत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कोर्ट निर्णय देईल.
या खटल्यातून आणि मकोकामधून मला दोषमुक्त करावे असा अर्ज वाल्मीक कराडने कोर्टासमोर केला आहे. यावर 17 तारखेला सुनावणी होणार आहे. केवळ वाल्मीक कराडने दोषमुक्तीचा अर्ज केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 17 तारखेला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

