लैंगिक अत्याचाराच्या घटना सुरूच; बीडमध्येही चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

बीड — परळी तालुक्यातील अल्पवयीन मुलीची, त्यानंतर हिवरा पहाडीच्या अल्पवयीन विवाहित अत्याचार प्रकरणाची घटना ताजी असतानाच पुन्हा आणखी एका अत्याचाराच्या घटनेने बीड शहर हादरले आहे. सहा वर्षाच्या चिमुकलीला चिकू देण्याचे अमिष दाखवून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षीय चिमुकली सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आपल्या मैत्रिणीच्या घरासमोर फुले वेचित होती. यावेळी एका मुलाने तिच्या मैत्रिणीला घरी जाण्याचे सांगत ‘चिकू देतो’ असे आमिष दाखवत सहा वर्षीय मुलीला स्वत:च्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर उचलून नेले. तिथे त्याने चिमुकलीशी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे घाबरलेली चिमुकली रडत आरडाओरडा करत खाली आली. तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. पीडितेच्या आई-वडिलांनी मंगळवारी पेठ बीड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणात पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान आरोपी विधी संघर्ष असून त्याला पोलिसांनी सुधारगृहात पाठवल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्यास टाळाटाळ होत असल्यामुळे मोठा समुदाय पेठ बीड पोलीस ठाण्यात जमला होता.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles