दिंद्रुड — ऊस तोडीची थकबाकी दे नाहीतर शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुझ्या पतीला मारून टाकण्यात येईल असे धमकी देत अत्याचार करत अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मुकादमाच्या त्रासाला कंटाळून महिलेने विष देऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दिंद्रूड पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका गावातील ऊसतोड मजूर जोडपं अमोल श्रीमंत शिनगारे याच्याकडे ट्रॅक्टरवर कामाला होते, दरम्यान दोन लाख रुपयांची थकबाकी त्यांच्याकडे शिल्लक राहिली होती .तुमच्याकडे असलेले पैसे दे अन्यथा माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव म्हणत अमोल शिनगारे याने जबरदस्तीने महिलेने अत्याचार केले. तसेच भेटायला ये अन्यथा फोटो व्हायरल करेल अशा धमक्या दिल्या.दरम्यान, सात महिन्यांपासून महिला भेटण्यास टाळाटाळ करत असल्याने अमोलने महिलेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले. शिनगारे याच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून पीडित महिलेने मंगळवारी सकाळी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माजलगाव येथील खाजगी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अमोल श्रीमंत शिनगारे याच्या विरोधात अत्याचारासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस शोध घेत आहेत.