Home क्राईम मस्साजोग मध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; ७-८ ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

मस्साजोग मध्ये मध्यरात्री धाडसी घरफोडी; ७-८ ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

0
9

बीड — केज तालुक्यातील मस्साजोग गावात मध्यरात्री चोरट्यांनी घरफोड्या करत एकाच रात्रीत तब्बल ७ ते ८ ठिकाणी धुडगूस घातला. यामधून संतोष देशमुख यांचे घर देखील सुटले नाही. शेतातील विद्युत मोटार पंपाचे कॉपर केबल देखील चोरी करण्यात आले. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून कॉपर केबलसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.

गावातील दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या घरातही ही चोरी घडली. विशेष म्हणजे, घरात धनंजय देशमुख, अश्विनी देशमुख आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित असतानाही चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश करून चोरी केली. सर्व सदस्य गाढ झोपेत असल्याने कोणालाही या घटनेचा सुगावा लागला नाही.
सकाळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त आढळल्यानंतर चोरीचा प्रकार उघड झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने आरडाओरडा करत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून बीड स्थानिक गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी पंचनामा करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या कॉपर केबलची मोठ्या प्रमाणावर चोरी केली असून सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करावा, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here