धाराशिव — मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारत मुंबईत लढा Mumbai protest दिला.त्यानंतर आता दिल्लीश्वरालाही जागं करण्यासाठी मराठ्यांच भगव वादळ दिल्लीला Delhi धडक देणार आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या Manoj jarange Patil मुंबईतील आंदोलनाला मोठ यश आलं आहे, त्यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्यात सरकारने हैदराबाद गॅझेट Hyderabad gadget लागू करण्यासंदर्भातील जीआर काढला आहे.
हा मराठा समाजाचा मोठा विजय मानला जात आहे, राज्यात लवकरच सातारा गॅझेट देखील लागू होण्याची शक्यता आहे.याच दरम्यान आता मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांनी मोठी घोषणा केली आहे, मराठ्यांचं वादळ आता दिल्लीमध्ये धडकणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे ते दिल्लीमध्ये अधिवेशन Maratha convention
घेणार आहेत. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणी नंतर दिल्लीमध्ये मराठा समाजाचं अधिवेशन होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली होती, लाखो मराठा बांधव हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनाला यश आलं, सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत, तर काही मागन्या मान्य करण्यासाठी वेळ मागितला आहे, मराठा समाजाची जी मुख्य मागणी होती, राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करा त्याचा जीआर सरकारने काढला आहे, त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी ही मोठी घोषणा केली आहे.
दरम्यान राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारने जीआर काढल्यानंतर आता ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी OBC समाजाकडून या जीआरला विरोध होत आहे. मराठा समाजाला आमच्यामधून आरक्षण नको अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे, तर दुसरीकडे याच गॅझेटवरून बंजारा समाज आणि आदिवासी समाज देखील आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. आमचा एसटीमध्ये समावेश करावा अशी मागणी बंजारा समाजाची आहे.

