केज — मराठा आरक्षण Maratha reservation मागणीसाठी मुंबईला Mumbai निघालेल्या वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने heart attack मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जुन्नर जवळ घडली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील Manoj jarange Patil यांच्या मुंबईमधील आंदोलनात सहभागी होण्यासाठी वरपगाव येथील 20 कार्यकर्ते मुंबईकडे गेले आहेत.
जुन्नर junnar परिसरात त्यांनी बुधवारी रात्री मुक्काम करुन गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चहा, नाष्टा करुन ते मुंबईकडे जात असताना वाहनातच सतीश ज्ञानोबा देशमुख वय 45 वर्ष यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या नंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.सतीश देशमुख यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
दुसऱ्या एका घटनेत केज तालुक्यातील भाटुंबा येथील प्रा. गणेश धपाटे हे देखील आपल्या मित्रांसह आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. मंचर जवळ चहा पिण्यासाठी उतरले असता रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने त्यांना धडक accident दिली. यामध्ये ते गंभीर रित्या जखमी झाले आहेत.

