शिरूर कासार — तालुक्यातील खालापुरी येथील एका हॉटेलमध्ये ४ जणांनी एका तरुणावर लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी हल्ला चढविला. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली आहे.
या हल्ल्यात नितीन लोंढे (वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण मारहाण हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओत चारही आरोपी एकाच व्यक्तीवर अमानुषपणे हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या प्रकरणी रोहित गायकवाड, शुभम लोंढे, आसिफ शेख आणि साहिल पठाण या चार जणांविरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारहाणीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याचा अधिक तपास शिरूर कासार पोलिस करत आहेत.

