Sunday, December 14, 2025

बंजारा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी

बीड —  मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आल्यानंतर, त्याच गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाला अनुसूचित जमाती  प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील मुरूम गावातील पवन चव्हाण या तरुणाने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. पवन गोपीचंद चव्हाण (वय ३२) हा तरुण मूळचा मुरूम गावातील नाईक नगर येथील रहिवासी होता. त्याने बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे अशी इच्छा सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी पोहोचल्यानंतर पवनच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली. त्या चिठ्ठीमध्ये त्याने हैदराबाद गॅझेटचा उल्लेख करून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles