Saturday, December 13, 2025

धुळे सोलापूर महामार्गावर जबरी चोरी करणारी टोळी पकडली

बीड — धुळे-सोलापूर महामार्गासह बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रवाशांची वाहने अडवून शस्त्राचा धाक दाखवून मारहाण करत रोड रॉबरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी जेरबंद केले. या कारवाईत आणखी चार गुन्हे उघडकिस आले आहेत
धुळे-सोलापूर महामार्गावरील वडगाव ढोक ता. गेवराई येथे रस्त्यावर तेलंगणातील प्रवाशांची गाडी आडवून. आरोपींनी वाहनातील प्रवाशांना मारहाण करत.सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली होती. लुटीची ही घटना गुरुवार दि. 4 डिसेंबर रोजी रात्री घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीड शहरातील संभाजी महाराज चौक परिसरात चालक झोपलेला असताना वाहनाची काच फोडून प्रवाशांना मारहाण करत सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी घडली होती.
याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल होता. यांसह आणखी दोन गुन्हे देखील उघडकीस आले असून गुरुवार दि. 11 डिसें. रोजी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची माहिती मिळाली. आरोपी चारचाकी वाहनातून कळंब-केज मार्गे येत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी केली.पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पाठलाग करून राहुल अनिल काळे वय 19 वर्ष, विकास अनिल काळे वय 21 वर्ष, अनिल रामा काळे वय 40 वर्ष ;सर्व रा. खामकरवाडी, ता. वाशी, जि. धाराशिव या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी त्यांचे अन्य साथीदार सुनील हिरामण शिंदे, सचिन उर्फ आवड्या रामा काळे व बबलू शिवा शिंदे यांच्या मदतीने वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून विना नंबरची एमजी व्हेक्टर चारचाकी गाडी, एक कोयता व लोखंडी रॉड जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि अण्णासाहेब पवार करीत आहेत. सदरील कारवाई नवनीत कॉवत, पोलीस अधीक्षक, बीड, सचिन पांडकर, अप्पर पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles