Sunday, December 14, 2025

धनंजय मुंडेंनी लाडक्या बहिणींसोबत भरला उमेदवारी अर्ज

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार धनंजय मुंडे यांनी गुरुवारी परळी विधानसभा मतदारसंघातून आपला विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धनंजय मुंडे यांनी कुठलेही शक्तीप्रदर्शन केले नाही.

धनंजय मुंडे यांनी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरणे पसंत केले. धनंजय मुंडे यांनी बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपच्या नेत्या विधान परिषदेच्या आ.पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
परळीतून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘यंदा पंकजा मुंडे यांच्यासोबत मी स्वतः माझा उमेदवारी अर्ज दाखल केला. पंकजा मुंडे या उमेदवार असताना मी त्यांचा सूचक होतो, त्यावेळी मी त्यांना घरी घ्यायला गेलो होतो आणि आज तोच क्षण पुन्हा आला. आज माझी बहीण माझ्यासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आली. हा वेगळाच आनंद आहे.’ असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धनंजय मुंडे म्हणाले की, ‘कोणतीही निवडणूक असली तरी मी ती सहज घेत नाही. लढाई ही लढाई असते. या लढाईमध्ये आपण संपूर्णपणे झोकून देऊन विजय प्राप्त करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे मी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहे. लोकसभेमध्ये आम्ही बहीण-भाऊ एकत्र होतो. पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघातून 75 हजारांचे मताधिक्य मिळाले होते म्हणून मी ही निवडणूक सहजपणे घेणार नाही.’
धनंजय मुंडे यांचा अर्ज दाखल करताना त्यांच्या लाडक्या बहिणी त्यांच्यासोबत होत्या. माजी खासदार प्रीतम मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या महिलाही त्यांचा अर्ज दाखल करताना सोबत उपस्थित होत्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles