विकासाचे टायमिंग साधणाऱ्या घड्याळाला मतदान करा
गेवराई — गेवराई चे पवार हे दलित व मुस्लिम समाजाचा द्वेष करणारे आहे. मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी समाजला ४ जागा सुटल्या असताना या दलित द्वेषी पवारांनी आंबेडकरी समाजाला प्रतिनिधित्व दिले नव्हते. तसेच आता ही सौ. वैशाली किशोर कांडेकर यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी या पवारांनी पप्पू कागदे यांचे पाय धरले आशा या दलित आणि मुस्लिम यांचा द्वेष करणाऱ्या पंडित-पवार युतीला पराभूत करा व माजी आ. अमरसिंह पंडित व आ. विजायसिंह पंडित यांचे हात बळकट करण्यासाठी विकासाचे टायमिंग साधण्यासाठी घड्याळाला मतदान करा असे आवाहन आरपीआयचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर यांनी केले.
गेवराई नगर परिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, या पवारांनी नेहमीच दलित व मुस्लिम द्वेषाची भुमिका घेतलेली आहे. याचा प्रत्यय मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आला होता. यांनी ४ जागा दलित समाजाला सुटल्या असताना एका ही जागेवर आंबेडकरी समाजाला प्रतिनिधित्व दिले नव्हते. तसेच नगराध्यक्ष पदावर मुस्लिम उमेदवार निवडून येऊ नये यासाठी ही प्रयत्न केले होते. हेच पवार आता १० वर्ष आमदारकी भोगून स्वतः च्या भावजयीला नगराध्यक्षा करण्यासाठी विकासाचे ढोंग करत आहेत. यांचा विकास म्हणजे नगरपरिषद चा निधी स्वतः च्या शेतात वापरून स्वतः च्या जमीनीचे भाव वाढवणे होय.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेवराई शहराची निवडून असताना पवार मात्र केलेल्या विकास कामावर व शहराच्या विकासाच्या व्हिजन वर बोलण्या ऐवजी पोथी-पुराण व ग्रामीण भागातील गप्पा मारत भाषण ठोकत आहेत. ही निवडणूक शहरातील मुद्द्यांची असल्याचे भान पवारांनी ठेवले पाहिजे. असे प्रतिपादन त्यांनी केले.
याउलट माजी आमदार अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी नेहमीच सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण केलेले आहे. भैय्यासाहेब यांनीच आरक्षित जागेवर बंजारा उमेदवार देऊन निवडून ही आणलेला आहे. मुजीब भाई सारख्या अल्पसंख्याक समाजातील तरुणाना बाजार समितीचे सभापती केले. कुमारराव ढाकणे, जगन पाटील काळे व जगन्नाथराव काळे यांसारख्यांना पदे देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यामुळे या स्वार्थ व ढोंगी पवारांना पराभूत करण्यासाठी व शहराचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी घड्याळाला मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. असे आवाहन त्यांनी केले.

