Sunday, December 14, 2025

तहसीलदाराची मुस्लिम विरोधी चंद्र “कला” मागच्या तारखेत निकाल देण्याची तयारी ?

बीड — मौजे वासनवाडी शिवारातील गट क्र. 150/अ मधील फेरफारात मंडळ अधिकाऱ्यांनी केलेल्या चुका कायम ठेवत खरेदीदाराचे खरेदी केलेले क्षेत्र घटवण्याचा घाट तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी घातला आहे.

तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर पैठण पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल असल्या कारणाने त्यांना निवडणूक कामकाजातून वगळण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर ‌ नरेंद्र कुलकर्णी यांच्याकडे तहसीलदार पदाचा कारभार सोपविण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी तसे आदेश दिले आहेत.

लाचेच शेण खाताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडलेला सचिन सानप या मंडळाधिकाऱ्याने हा फेर केला होता. मौजे वासनवाडी शिवारातील गट क्र.150/अ मधील फेरफार क्रमांक 3050 रद्द करण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे जमील महंमद गुलाम अहमद यांनी तक्रार दाखल केली होती. हा फेर रद्द करून हे प्रकरण तहसीलदार बीड यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते. या ठिकाणी प्रकरणाशी संबंधितास लेखी म्हणणे मांडण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देऊन संधी देण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. सदरील प्रकरण तक्रारदार जमील मोहम्मद यांच्या वकिलांनी अर्जदारांच्या वतीने म्हणणे मांडण्याची विनंती तहसीलदारांकडे केली होती. मात्र या प्रकरणातील तक्रारदार आणि ज्याचं क्षेत्र कमी करण्यात येणार आहे अशा कुणाला ही कुठलीही नोटीस नाही. आणि विशेष तक्रारदार चे वकील निकाल राखीव ठेवण्याच्या तारखेला बाहेर गावी होते तरी निकालासाठी प्रकरण ठेवले व जमील मोहम्मद गुलाम अहमद यांचं तसेच त्यांच्या वकिलाचं लेखी म्हणने सुध्दा घेतले नाही. या प्रकरणाची सर्व सुनावणीची पूर्वतयारी “नीलकमल”च्या वरच्या कप्प्यात बसून करण्यात आली अशी चर्चा आहे . आता याप्रकरणी मागील तारखेत निकाल देऊन तक्रारदाराचं खरेदी केलेले क्षेत्र कागदोपत्री कमी करण्याचा डाव आखला जात आहे. या प्रकरणात जी चूक सचिन सानप या लाचखोर मंडळ अधिकाऱ्यांने यांनी केली त्याच चुकीची “री”ओढण्याची तयारी तहसीलदार शेळके यांनी जातीयवादी चंद्र”कला” दाखवण्याची तयारी केली आहे .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles