बीड — प्रकरणाची थोडक्यात हकीकत कि, गैरअर्जदार जाधव व कुरुळे यांनी बोगस कुळाचे प्रमाणपत्र हस्तगत करून मौजे तळेगाव येथील सर्वे नंबर 19 चे गट क्र. 15 ते 23 क्षेत्र 19 एकर 22 गुंठे व सर्वे क्र. 20 चे गट क्र. 24 ते 29 मधील क्षेत्र 21 एकर 4 गुंठे जमीन स्वतःचे नावे हस्तांतरित करून घेतलेली होती, मयत गुलाबी किशन प्रसाद यांची नात अंजुम यांनी कुळाचे प्रमाणपत्र बोगस असल्याने व सदर वादग्रस्त जमीन वर्ग 2 ची असताना वर्ग 1 म्हणून बोगस नोंद सातबारा वरती करून घेतल्याने मा. तहसीलदार बीड यांचे कोर्टात प्रकरण क्रमांक 2025/कुळ/कावी – 4012 दाखल केले, मा. तहसीलदार यांनी दोन्ही बाजूचे पक्षकारांनी दाखल केलेल्या सर्व कागदपत्राची पडताळणी करून दोन्ही बाजूंचे वकिलांचा युक्तिवाद होऊन प्रकरण निकालासाठी राखीव ठेवण्यात आले, व दिनांक 4/ 9/ 2025 रोजी न्यायनिर्णय जाहीर करून सदर वादग्रस्त जमीनि वरील जाधव व कुरुळे व व प्लॉट धारकांचे सातबारा वरील नोंदी कमी करून मयत गुलाबबी किशन प्रसाद यांचे नावाची नोंद घेण्याबाबत मंडळ अधिकारी व तलाठी यांना आदेश पारित केले, खऱ्या अर्थाने मयत गुलाबी किशन प्रसाद यांची नातं शेख अंजुम यांना तब्बल 70 वर्षानंतर न्याय मिळाला आहे, या वादग्रस्त जमिनीपैकी 12 एकर जमीन वरद बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बीड यांनी जाधव व कुरुळे यांचे साहाय्याने प्रकरणाची खरी माहिती असताना सुद्धा 182 लोकांना प्लॉट विक्री केलेले आहेत. या प्रकरणात अर्जदाराचे वतीने एडवोकेट सचिन एस. जायभाये यांनी भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडली, अर्जदाराचा बचाव,कागदोपत्री पुरावा व युक्तिवाद ग्राह्य धरून तहसीलदार यांनी अर्जदारचा अर्ज मंजूर केला, या निकालाने बीड जिल्ह्यातील भूमाफिया यांचे धाबे दणाणले आहेत.

