बीड — गेल्या काही दिवसांपासुन बीडचे खासदार बजरंग सोनवणे कोणत्याना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये थेट खासदारकीचा राजीनामा देईल असं म्हटलं आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
आज खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्ह्यातील बिंदू नामावलीच्या विषयावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मला कॉल केला होता असा दावा देखील केला होता. तसेच जर माझा बिंदू नामावलीच्या गैरप्रकारात काही पुरावे आढळले तर मी जिल्ह्यातील सर्वांची माफी मागून राजीनामा देईल असं देखील खासदार सोनवणे म्हणाले.
बिंदू नामावलीच्या गैर प्रकारात माझ्याबद्दल काही पुरावे सापडले तर जिल्ह्यातील सर्वांची माफी मागून राजीनामा येईल देईल असं बजरंग सोनवणे म्हणाले. तसेच बिंदूंनी नामावली संदर्भात बीड जिल्ह्यात ओपन प्रवर्गावर अन्याय होत असल्याचा देखील खासदार सोनवणे यांनी सांगितलं. तर पुढील 1 ते दीड महिन्यात बीड पर्यंत रेल्वे येणार आहे आम्ही परळीमधील रेल्वे स्टेशन संदर्भातील अडचणी देखील दूर केल्या आहेत अशी माहिती देखील त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली.तर या पत्रकार परिषदेमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले आहे. वाल्मिक कराड परळीत बसून सर्व चालवत होता.असा दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तसेच पालकमंत्री अजित पवार जिल्ह्यात चुकीचं काम करु देणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.