ठाणे — बीड तालुक्यातील हिवरा पहाडी येथे अल्पवयीन विवाहित महिलेवर उचलून नेत अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.भिवंडीतून एका 15 वर्षीय आदिवासी मुलीचे कथितरित्या अपहरण करून तिला लग्नाचे आमिष दाखवले.तिला पाटोदा तालुक्यातील एका व्यक्तीला विकल्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी मुलीचा पती आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अत्यंत गरिबी आणि पालकांचा आधार नसल्याने या पीडित मुलीचे शोषण करण्यात आले. २६ फेब्रुवारी रोजी एका दलालाने आणि त्याच्या साथीदारांनी तिला लग्नाद्वारे चांगले आयुष्य देण्याचे वचन देऊन तिचे कथितरित्या अपहरण केले,
झोपलेल्या अल्पवयीन विवाहितेला उचलून नेले, अत्याचार केला चावडीच्या खांबाला बांधून आरोपी पळाला
मात्र प्रत्यक्षात त्यांनी तिला बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका वयस्कर व्यक्तीला विकून टाकले.२७ फेब्रुवारी रोजी धमक्या देऊन या अल्पवयीन मुलीला एका बेकायदेशीर लग्नासाठी भाग पाडण्यात आले. २७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत तिचा पती भाऊसाहेब तांबे याने तिला शेतातील एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. तिच्या एका नातेवाईकाने तिला शोधून काढले. तिने तिच्यावर ओढवलेल्या संकटाची कहाणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
85 लाखाच्या अपहार प्रकरणी खोकरमोहाचे सरपंच श्रीहरी मिसाळ वर अपात्रतेची कारवाई
याप्रकरणी पडघा पोलिसांनी मुख्य आरोपी भाऊसाहेब तांबे, मध्यस्थ विलास हिलम आणि इतरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या संदर्भात प्रभात दैनिकाच्या न्यूज वेबसाईटने वृत्त प्रकाशित केलं आहे.
लक्षवेधी ! खरवंडी — राजूरी महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाची अनियमितता ;आ.क्षीरसागर आक्रमक




