बीड — मैंदा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून ही कारवाई पिंपळनेर पोलिसांनी केली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळनेर पोलिसांना मैंदा शिवारात, मैंदा फाटा ते गाडीउतार तांडा रोडच्या उजव्या बाजूला विटभट्टीजवळ लिंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीररित्या ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत व खेळवत आहेत अशी गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे, पोलीस अंमलदार वैजिनाथ चंद्रकांत मगर यांच्या फिर्यादीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घूगे,आणि पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल यांच्या पथकाने सायंकाळी साडेचार वाजता अचानक छापा टाकला.छाप्यादरम्यान, पाच इसम गोलाकारात बसलेले आणि जुगार खेळताना आढळून आले.
यावेळी सुभाष गोपिनाथ चव्हाण वय ४० वर्षे,
गंपु गुंडीबा कसबे वय ६० वर्षे,
दिलीप शिवाजी घोरड वय ३२ वर्षे,
हनुमंत रामभाऊ लोकरे वय ३८ वर्षे,
शिवाजी रंगनाथ कसबे वय ५५ वर्षे
सर्व रा. मैंदा, ता. जि. बीड. अशी जुगार खेळणाऱ्या आरोपींची नाव आहे. यावेळी पोलिसांनी रक्कम, मोबाईल, आणि पाच मोटारसायकली (हिरो स्प्लेंडर पल्स, बजाज डिस्कव्हर, बजाज बॉक्सर, बजाज प्लॅटीना) असा एकूण ३ लाख ४९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .या आरोपींविरुद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार बंदी कायदा प्रमाणे कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशन करत आहे.
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपोअ सचिन पांडकर, उपविपोअ हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक मधुसूदन घूगे, पो उप नी गोलवाल, पोलीस अंमलदार शेळके, गरजे, मगर, ढाकणे पठाण, विघ्ने, तावरे यांनी केली आहे.

