जर्मन बेकरी’प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदारचा गोळीबारात मृत्यू

श्रीरामपूर — पुणे येथे 2012 मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी भर दिवसा गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये जखमी झालेल्या अस्लम चा उपचार घेत असताना अहिल्यानगर मधील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

बंटी जहागिरदार कॉलेज रोडने दुचाकीवरून जात असताना अचानक दोन अज्ञात इसमांनी जवळ येत त्याच्यावर गोळीबार केला.यामध्ये जखमी झाल्याने त्याला श्रीरामपूर मधील कामगार रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलं. येथे त्याची प्रकृती गंभीर झाल्यानंतर अहिल्यानगर मधील साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान सायंकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. बंटी जागीरदार वर गोळीबार झाल्याची घटना घडताच काही सेकंदातच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात प्रचंड खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक दुकाने तातडीने बंद करण्यात आली. अस्लम शेख उर्फ बंटी जहागिरदार हे नाव २०१० साली पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात चर्चेत आला होता. या प्रकरणातील तो प्रमुख आरोपींपैकी एक होता. दीर्घ काळ तुरुंगवासानंतर त्याला २०२३ मध्ये जामीन मंजूर झाला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो श्रीरामपूर परिसरात राहत असल्याची माहिती आहे.

या पार्श्वभूमीवर झालेला हा हल्ला केवळ वैयक्तिक वादातून झाला की यामागे काही मोठा कट आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली. तसेच, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी काही समर्थक व नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत, शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढविण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी विशेष पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. हल्लेखोर कोण होते, त्यांनी कोणत्या दिशेने पलायन केले, तसेच हल्ल्यामागील नेमके कारण काय याचा सखोल तपास सुरू आहे. वैयक्तिक वैर, जुना वाद की गुन्हेगारी पार्श्वभूमी यापैकी कोणता धागा पुढे येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles