
बीड — गोदावरी पात्रात म्हाळस पिंपळगाव येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मारलेल्या छाप्यात चार ट्रॅक्टर सह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. म्हाळस पिंपळगांव येथे वाळू उपसा केला जात असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली. गेवराई पोलिसांनी या ठिकाणी छापा मारताच चार ते पाच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूस केन्या लावून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहताच तीन ट्रॅक्टर चालक यावेळी फरार झाले.तर आकाश भास्कर भिताडे वय 23 वर्षे, रा. गंगावाडी, ता. गेवराई जि. बीड या ट्रॅक्टर चालकास पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात स्वराज कंपनीच्या चार ट्रॅक्टर केन्यासह असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उप विभागीय पोलीस अधीकारी अनिल कटके पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि, सतीष कोटकर, पोउपनि प्रदीप आढाव, ग्रेडपोउपनि श्रीमंत उबाळे, जितेंद्र ओव्हाळ, गोरक्ष डोके यांनी केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रदिप सांळुके हे करीत आहेत.

