माजलगाव — शहरातील भाजप कार्यालयासमोर भर दिवसा भाजपचा सक्रिय कार्यकर्ता तथा आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य असलेले बाबासाहेब आगे याचा खून झाला आहे. कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले.
नारायण शंकर फपाळ याने भर दिवसा हा खून केला असून, या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतं आहेत.शहरात भर दिवसा ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. हत्या केल्यानंतर नारायण फपाळ हा आरोपी स्वतः पोलिस ठाण्यामध्ये हजर झाला. अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या जवळ भर वस्तीत भाजपचं कार्यालय आहे. तिथं कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही हत्येची घटना घडल्याने दहशत पसरली आहे. बीडमधील शांतता-सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे
आरोपि नारायण फपाळ हा रागारागाने आगे यांच्यावर कोयत्याने वार करत होता, त्यावेळी परिसरात दहशत निर्माण झाली होती. काहीशी पळापळ झाली होती. हा सर्व प्रकार काहींनी व्हिडिओमध्ये कैद केला असून, हे व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होऊ लागले आहेत.
मयत बाबासाहेब आगे वय 30 वर्ष हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य देखील आहेत. भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ भाजप कार्यालय येथे आले होते. त्या कार्यालयाच्या समोरच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपी नारायण फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. बाबासाहेब आगे समोर येताच, फपाळ याने त्यांच्यावर सपासप वार केले. फपाळ याने माजलगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर होऊन हत्येची माहिती दिली