आष्टी:वाळू माफियांचा धुमाकूळ; कर्मचाऱ्यांवर हल्ला करत तहसीलमधून जप्त टेम्पो पळवला

आष्टी — येथील तहसील कार्यालयातून वाळू माफियांनी चक्क जप्त केलेला वाळूचा टेम्पो पळवून नेल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री घडली. तहसीलदार वैशाली पाटील या रजेवर जाताच संधी साधून ६ ते ८ जणांच्या टोळीने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत हा प्रताप केला आहे. आश्चर्य म्हणजे तहसीलच्या आवारातच ही घटना घडली आहे.
तहसीलदार वैशाली पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो पकडून तहसील कार्यालयात लावला होता. गुरुवारी वैशाली पाटील रजेवर गेल्या आणि प्रभारी तहसीलदार म्हणून विनोद रणविरे यांनी पदभार घेतला. रात्री ८:३० च्या सुमारे ८ वाळू माफिया तहसील कार्यालयाच्या पाठीमागील भिंतीवरून आत शिरले. त्यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या दोन कोतवालांना धक्काबुक्की करत हुज्जत घातली.माफियांनी जप्त केलेला टेम्पो चालू करून तो पळवण्यास सुरुवात केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. माफियांच्या या दहशतीमुळे कर्मचारी बाजूला झाले आणि त्यांनी टेम्पो पळवून नेला. माफियांचा दुसरा एक ट्रक पळवण्याचा प्रयत्न मात्र फसला.या सर्व घटनेचा थरार तहसील कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माहिती तात्काळ नायब तहसीलदार आणि जमाबंदी विभागाला देण्यात आली आहे. प्रभारी तहसीलदार विनोद रणविरे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून, संबंधित गुंडांवर कठोर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र देण्यात येणार असल्याचे सांगितले. आता या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles