श्रीमती प्रेमलता पारवे यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
बीड — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्ष आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्यासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या जाहिर सभेचे आयोजन बीड येथे करण्यात आले असून यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शिवसेना-शिवसंग्राम-सपा व मित्रपक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रचाराच्या अंतिम टप्प्यात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलताताई पारवे यांच्यासह सर्व उमेदवारांनी आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार दुसऱ्यांदा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात ना. अजितदादा पवार यांनी आपल्या जाहिर सभेत विकासाचे व्हिजन मांडल्यामुळे बीड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यासह मतदारांमध्ये उत्साह भरला होता. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ना. अजितदादा पवार यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बीड शहरातील बशीरगंज चौक येथे आज सायं. ५.३० वाजता होणाऱ्या या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेने राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदासह सर्व ५२ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या विजयावर शिक्का मोर्तब होणार आहे.
उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असून या जाहिर सभेस बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित, डॉ.ज्योतीताई मेटे, अनिलदादा जगताप, खमरूल इमान यांच्यासह कल्याणराव आखाडे, दिलीप गोरे, शेख मुजीब, अमर नाईकवाडे, फारुक पटेल, बळीराम गवते, अशफाक इनामदार, झुंजार धांडे, शेख निजाम, भिमराव वाघचौरे, विनोद मुळूक, बाळासाहेब गुंजाळ, रामसिंग टाक, विनोद हातागळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस-शिवेसना-शिवसंग्राम-सपा आणि मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

