मुंबई — धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड हा निकटवर्तीय असल्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सातत्याने मुंडे आणि कराडवर गंभीर आरोप करत आहेत आज त्यांनी याच संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
दमानिया यांनी २५ ते ३० मिनिटे त्यांना भेटली. हे माणुसकीला काळिमा फासण्याचे कृत्य झालं आहे, असे त्यांचं म्हणणं होतं. मग त्यावर मी त्यांना तुम्ही राजीनामा का घेत नाहीत, असे विचारले. मी त्यांना सर्व पुरावे दिले. आज त्यांना मी धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेस कसे आहेत. त्यांच्या कंपनीत आर्थिक नफा कसा मिळतो. ऑफिस ऑफ प्रॉपर्टीमध्ये हे सर्व कसं बसतंय, त्यामुळेच तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुम्ही राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
“धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविरोधात अजित पवार यांना पुरावे दिले आहेत. या दोघांचेही आर्थिक संबंधांची त्यांना माहिती दिली आहे. याबाबत अजित पवार उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान ते मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील. जर अजित पवार यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर कोर्टात जाणार, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.
त्यामुळे आता या पुराव्यांवरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला तर त्यांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.