सुनेवर अन्याय करणाऱ्या प्रेमलता पारवे बीड शहराला न्याय काय देणार?
बीड — अजित दादा..! विकासाच्या गप्पा बीडकरांनी भरपूर ऐकल्या तुमच्या पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवी हगवणे हिने कौटुंबिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तशीच घटना बीडमध्ये देखील तुमच्या नगरपालिकेच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांच्या बाबतीतही होत आहे. ज्या स्वतःच्या सुनांना न्याय देऊ शकत नाही त्या बीडच्या जनतेचं भलं काय करणार? त्यांना न्याय काय देणार? असा प्रश्न विचारला जात आहे. तुमच्याच नशिबाला अशी लोक का येतात? असा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने यावेळी बीड नगरपालिकेत प्रेमलता पारवे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. प्रचारही जोरात सुरू आहे. पारवेंच्या जीवावर क्षीरसागरांची नगरपालिकेतली मक्तेदारी मोडून काढायची याचा चंग बांधला गेला. त्यासाठी दलित चळवळीत काम करणारे समाजाप्रती निष्ठावान असलेले तरुण पप्पू कागदे यांना सुरुवातीला उमेदवारीची गळ घातली. ऐनवेळी त्यांना धोका देऊन प्रेमलता पारवे यांना उमेदवारी दिली.डाॅ. योगेश क्षीरसागर यांना देखील पक्षातून बाहेर पडावं लागलं. एवढा खेळ खंडोबा करत असताना उमेदवार तितका दर्जाचा आणि तोला मोलाचा असावा याचा विचार मात्र केला गेला नाही. यातूनच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची आठवण ताजी झाली. बीडचे धडाडीचे पत्रकार “संग्राम धन्वे” यांनी “मराठी महाराष्ट्र”च्या ( youtube) माध्यमातून प्रेमलता पारवे यांनी सुनेवर केलेल्या अत्याचाराची घटना जनतेसमोर आणली. सुनेवर केलेल्या अत्याचाराच प्रकरण समोर आल्यानंतर बीडमध्ये खळबळ माजली. नेमके याचवेळी अजितदादा बीडमध्ये जनतेला प्रेमलता पारवे यांच्या माध्यमातून बीडची बारामती करण्याचे स्वप्न दाखवत भाषण ठोकत आहेत. व्हायरल झालेल्या युट्युब चॅनेल मध्ये सुनेने मांडलेली कैफियत हृदयाला पाझर फोडणारी आहे. प्रेमलता पारवे यांनी आपला मुलगा सत्यजित पारवे यांचा विवाह 2012 मध्ये करून दिला. विवाह झाल्यानंतर घरात आलेल्या नव्या सूनेवर थोडाफार अत्याचार सुरूच होता. मुलगा झाल्यानंतर तरी परिस्थिती सुधारेल त्रासातून सुटका होईल अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली. सुनेने आपल्या पतीला ड्रिंक सह बाहेरचे नाद आहेत. यामुळे त्यांना किडनी विकार सुरू झाला. याच्यावर उपचार करण्यासाठी लागणारा खर्च तुझ्या आईकडून घेऊन ये असं सांगून मारहाण करण्यात आली. माझी आई गरीब टेलर काम करुन पोट भरणारी असल्याने पैसा देणं शक्य नव्हतं. एक दिवस मला घरातून बाहेर काढलं. याप्रकरणी न्यायालयात पाच वर्षापासून न्यायासाठी लढा देत आहे. प्रेमलता पारवे न्यायालयाने वॉरंट काढलं असलं तरी एकदाही न्यायालयात फिरकल्या नाहीत. आश्रयासाठी मामाच्या घरी राहात होते. मात्र कोरोना काळात मामांचं निधन झालं. त्यानंतर माझ्यापासून मुलाला मारहाण करून घेऊन गेले. न्यायालयाने मुलाची जबाबदारी माझ्यावर सोपवली असली तरी तो माझ्याकडे सोपवायला प्रेमलता पारवे तयार नाहीत अशी करुण कहानी सांगितली. तुझे तुकडे करून मारून टाकू
अशा धमक्या एका स्थानिक सायं दैनिकाच्या संपादकाच्या जीवावर करत असल्याचा आरोप देखील प्रेमलता पारवेंच्या सुनेने केला आहे.
कोरोना पासून मी माझ्या मुलाला पाहिलं देखील नाही असं म्हणून हृदय पिळवटल जाईल असा आक्रोश देखील या सुनेने केला. एवढेच नाही तर प्रेमलता पारवे यांच्या मोठ्या मुलाचे देखील दोन लग्न झालेली आहेत. या सुनांना देखील असाच त्रास दिला जात असल्याचे देखील तिने सांगितलं.
विशेष म्हणजे प्रकरण एवढं मोठं असून देखील पेठ बीड पोलिसांनी या पिडीत सुनेची तक्रार घेण्याची तसदी वाटली नाही. हे बीडच्या पोलीस दलाचं कार्य कर्तुत्व आहे.
माध्यमांमध्ये हे प्रकरण गाजत असताना अजित पवार मात्र बीडच्या जनतेला विकासाची स्वप्न अशा लोकांच्या जीवावर दाखवत आहेत. अजित दादा…! ज्या प्रेमलता पारवे स्वतःच्या सुनेला छळत असतील त्या बीडच्या जनतेला न्याय वागणूक कशा देतील? विकास स्वतःचा करतील की जनतेचा? राजेंद्र हगवणेच्या सुनेने देखील कौटुंबिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती ते प्रकरण अजूनही जनता विसरलेली नाही तो तुमच्याच पक्षाचा होता. प्रेमलता पारवे देखील तुमच्याच पक्षाच्या उमेदवार आहेत. अशी माणसं निवडून बीडकरांच्या माथी तुम्ही मारणार आहात का? प्रेमलता पारवे निवडून आल्यानंतर माझ जगणं अवघड करतील. जीवे मारण्याच्या धमक्या यापूर्वी देखील त्यांनी दिल्या आहेत. धमक्याप्रमाणेच माझं जगणं देखील अवघड केलं आहे.मग अजित दादा वैष्णवी जिवानिशी गेली. पारवेंची सून जिवंत आहे. दोन्ही प्रकरणामधला फरक एवढाच आहे. मग पारवेंच्या सुनेच्या जीवाचं बरं वाईट होण्यासाठी बीडकरांनी तुमच्या पक्षातील लोकांच्या पापात का सहभागी व्हायचं?
बीडचा गुन्हेगारीचा आलेख आणखी वाढवायचा आहे का? तुमच्या पक्षाला वारंवार बीडच्या जनतेने साथ दिली.ती बीडकारांची चूक आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. दादांच्या आजच्या भाषणातील हवा वाफे सारखी हे प्रकरण पुढे आल्यानंतर विरून गेली आहे.

