Category Uncategorized

“राधिका” हॉटेलचे मालक सुग्रीव रसाळ यांच निधन

बीड — बालाघाटावरील प्रसिद्ध उद्योजक तथा “राधिका हॉटेल”चे मालक सुग्रीव अण्णा रसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. बालाघाटावरील मांजरसुंबा या ठिकाणी “राधिका हॉटेल”स्थापन करून हॉटेल व्यवसायात सुग्रीव रसाळ यांनी चांगला जम बसवला होता. सावकार या नावाने देखील ते बालाघाटावर…

एबीपी माझा’चे प्रमोद जोशी यांना पितृशोक

बीड — शहरातील जटाशंकर गल्ली मध्ये राहणारे प्रभाकरराव (पोपट काका) जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 75 वर्षाचे होते. अतिशय बोलका व प्रेमळ स्वभाव असल्यामुळे ते सर्वपरिचित होते. एबीपी माझाचे कॅमेरामन तथा चॅनल प्रतिनिधी प्रमोद (पिंटू) जोशी व…

संपादक राजेंद्र होळकर यांना पत्नीशोक; सुहासिनी होळकर कालवश

बीड — अभिमान परिवाराचा आधार असलेल्या संपादक राजेंद्र होळकर यांच्या पत्नी सुहासिनी होळकर (वय 54) यांचे उपचारा दरम्यान पुणे येथे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. सुहासिनी होळकर यांच्या निधनाने अभिमान परिवाराचा मोठा आधार कोसळला…

कामगार कायद्यात बदल; बारा तास करावे लागणार काम

मुंबई — महायुती सरकारने कामगार कायद्यात मोठा बदल केला आहे. बुधवारी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत cabinet meeting कारखाने अधिनियम १९४८ आणि आस्थापन अधिनियमात सुधारणा मंजूर करण्यात आल्या.या बदलानुसार, आता कारखान्यातील कामगारांना दिवसाला ९ ऐवजी थेट १२ तास काम करावे लागणार आहे.…

ऑनलाइन गेमिंग विधेयक 2025 लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली – ऑनलाइन गेम्समधील जुगारावर चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत विधेयक मांडले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५’ हे विधेयक सादर केल्यानंतर ते चर्चे विनाच संमत करण्यात आले. यामुळे रिअल मनी गेमिंग…

गढी जवळील भीषण अपघाताने गेवराई हादरली; सहा तरुणांचा मृत्यू

गेवराई — महामार्गाच्या दुभाजकात अपघात ग्रस्त अडकलेली गाडी काढत असताना भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. यात सहा तरुण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री गढी येथील उड्डाणपूलावर घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी…

इयत्ता 12वीची परीक्षा सूरु; निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

मुंबई — बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं या…

विष्णू चाटेसह सुदर्शन घुले चा मोबाईल डेटा रिकव्हर; वाल्मीक कराडवर खुनाचाच गुन्हा

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका दाखल झालेला आहे. मात्र त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती.धनंजय देशमुख यांनी यावर माध्यमांशी संवाद साधत सर्वच आरोपींवर खुनाचा गुन्हा आणि मकोका दाखल झाल्याचं सांगितलं. धनंजय देशमुख…

डोळ्यात मिरची पूड टाकून कात्रीने छातीवर केले सपासप वार

बीड — तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली?” असा जाब विचारत डोळ्यात मिरची पूड टाकून, केस कापण्याच्या कात्रीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील लोणगाव येथे घडली. या घटनेत अनिल आत्माराम गायके हा तरूण जखमी झाला…

अंगणवाडीतील खिचडीतून अकरा मुलांना विषबाधा

माजलगाव — तालुक्यातील टाकरवन जवळील फुलसिंग नगर तांडा येथे अंगणवाडीत शनिवारी सकाळच्या सुमारास खिचडी खाल्ल्याने 11 बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. टाकरवन जवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा या…