Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — नरेगा योजनेअंतर्गत राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व प्रकारच्या कामांचे वर्क कोड डिलीट झाल्याने लाभार्थ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक गावांमध्ये कामे थांबली असून मजुरांना रोजगार मिळण्यात अडचणी येत आहेत. या गंभीर प्रश्नी तातडीने कार्यवाही करून निलंबित कामे सुरू करणे व मस्टर तात्काळ चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठीचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश शेळके पाटील यांच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठजी गोगावले यांनी आयुक्त , नरेगा विभाग, नागपूर, जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. बीड, उपजिल्हाधिकारी (रोहयो), बीड,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जि.प. सत्वर कार्यवाहीसाठी आदेशीत केले आहे. तसेच गटविकास अधिकारी राठोड यांनी लाभार्थ्यांना महत्त्वाची सूचना दिली आहे. कामांच्या पुनर्मंजुरीसाठी (दुबार वर्क कोड) मूळ संचिका व चालू तारखेचा 7/12 उतारा घेऊन तातडीने पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
राजुरी नवगण व कामखेडा गणातील सर्व गावांना वर्क कोड डिलीट होण्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून पुनर्मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मस्टर तात्काळ सुरू करण्याची मागणी निवेदनात स्पष्टपणे करण्यात आली. लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.