गेवराईत दिवाळीच्या दिवशी आगीचे तांडव; सिलिंडर स्फोटाने चार घरांचे नुकसान, चौघे गंभीर

Spread the love

गेवराई सिलिंडर स्फोट: दिवाळीच्या दिवशी गॅस सिलेंडरचा स्टफो झाल्याने चार घरांना आग लागली.

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा युवा सेना बीड जिल्हा

- जाहिरात -

गेवराई — दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीत गेवराई शहरातील संजयनगर परिसरात भीषण दुर्घटना घडली. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत चार घरांचे मोठे नुकसान झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अवघ्या काही क्षणांत होत्याचे नव्हते झाल्याने बाधित कुटुंबांवर मोठे संकट कोसळले आहे.

गेवराई सिलिंडर स्फोट कसा झाला?

शनिवारी (ता. ७) रात्री संजयनगर परिसरात दिवाळीचा उत्साह सुरू असताना ही घटना घडली. परिसरात फटाके फोडले जात असताना एका फटाक्यामुळे पणतीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीने पुढे गंभीर स्वरूप धारण केले. लक्ष्मण चव्हाण यांच्या घरापर्यंत आग पोहोचल्यानंतर स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे आगीची तीव्रता वाढली आणि शेजारील घरांनाही तिची झळ बसली.

गेवराई सिलिंडर स्फोट

स्फोटाचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीत अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीने चार घरांना वेढल्याने घरातील साहित्य वाचविण्याची संधीही मिळाली नाही. कपडे, फर्निचर, अन्नधान्य आणि इतर संसारोपयोगी वस्तू जळून नष्ट झाल्या. एका दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेत प्रकाश राठोड आणि लक्ष्मण चव्हाण यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले. दुर्घटनेची माहिती मिळताच शिवराज पवार, आसेफ, राजू पठाण, निहाल शेख, आरबाज आणि आमन समीर या तरुणांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जखमींवर गेवराई येथील क्रिटिकल रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यापैकी एका महिलेची प्रकृती अधिक गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच गेवराई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगरपालिकेचे पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले. पाण्याचा मारा करून आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही काळाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत चार घरांतील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

दिवाळीच्या सणासाठी घरात आनंदाचे वातावरण असताना अचानक घडलेल्या या दुर्घटनेने संजयनगर परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत. चार कुटुंबांचा संसार आगीत उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या मदतीसाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी पुढे यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गेवराई सिलिंडर स्फोटानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली होती. गेवराई सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. प्रशासनाने या गेवराई सिलिंडर स्फोटाची चौकशी सुरू केली आहे.

येथे वाचा
येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *