Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — जि.प., नगरपालिका महानगरपालिका शाळांमध्ये मे 2026 पर्यंत रिक्त होणारी शिक्षकांची पद पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील पालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील…

इस्लामाबाद — पाकिस्तान फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात संस्कृतचे धडे विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत. संस्कृत भाषेतील महाभारत व भगवद्गीतादेखील विद्यार्थ्यांना शिकवली जाणार असल्याचे विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी सांगितले आहे. पाकिस्तानात पुढील दहा ते पंधरा वर्षांत संस्कृत भाषेतील विद्वान तयार होतील, असा विश्वास लाहोर विद्यापीठाचे…

मुंबई — शालार्थ आयडी घोटाळा राज्यभर गाजत असून अनेक अपात्र शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने समाविष्ट केले. त्यांना वेतनही देण्यात आले. या प्रकरणाची वाढत असलेली व्याप्ती पाहता शासनाने विशेष चौकशी पथकाला आणखी 4 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. राज्य सरकारला…

मुंबई — राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी 5 डिसेंबरला राज्यव्यापी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या प्राथमिकच्या 21,477 आणि माध्यमिक शाळेतील 2539 शाळेतील एकूण 96 हजार 800 शिक्षक शिक्षकांवर शालेय शिक्षण विभागाकडून एक दिवसाची वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे. ही…

मुंबई — राज्यातील शाळांच्या संच मान्यतेसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयातून राज्यातील बहुसंख्य अनुदानित आणि सरकारी शाळा संकटात सापडल्या आहेत. त्यात 5 डिसेंबरपर्यंत होणाऱ्या संच मान्यतेनंतर शेकडाे शिक्षक अतिरिक्त ठरून राज्यातील कमी पटसंख्येच्या सुमारे 18…

बीड — शिक्षक भरती घोटाळ्यात झालेल्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्या प्रकरणी बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे या भ्रष्ट जोडगोळीचं निलंबन करण्यात आलं आहे. बुधवारी या दोघांच्या निलंबनाचे आदेश प्रधान सचिव रणजीसिंह देओल यांनी दिले आहेत.…

मुंबई — विद्यार्थी व पालकांची होणारी फसवणूक आणि शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील २२ बनावट (मान्यता नसलेल्या) विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या विद्यापीठांवर कारवाई करण्याच्या वारंवार निर्देशांनंतरही राज्य सरकारांकडून दुर्लक्ष होत असल्याने भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान…

सिनेटच्या सदस्य पदी निवडीनंतर विद्यापीठाच्या बैठकीला उपस्थिती बीड — विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाली आहे. आ.संदीप क्षीरसागर यांची निवड ही विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी विधानसभेचा प्रतिनिधी कोट्यातून केली आहे.…

चौसाळा — नवगण शिक्षण संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये इतिहास विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 15 सप्टे.2025 रोजी सोमवारी सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये स्पर्धा महाविद्यालयात संपन्न झाली.…

नागपूर — राज्य सरकारने शिक्षकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी (document verification) केली जाणार आहे. बोगस शिक्षक असूनही ते वेतन घेत असल्याचे प्रकार समोर आले आहे. त्यामुळे आता सर्व शिक्षकांची पडताळणी केली जाणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांची बोगस…