Thursday, November 21, 2024

पोलिसांनी 138 कोटीचं सोनं असलेला कंटेनर पकडला

पुणे — विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहत असल्याने पोलिस यंत्रणा देखील गाड्यांची झाडाझडती घेत आहे. त्यातच खेड-शिवापूर येथे 5 कोटींची रोकड तपास यंत्रणांच्या हाती लागली होती.कोल्हापूर च्या दिशेने जात असलेल्या इनोव्हा गाडीतून ही मोठी रोख रक्कम पकडण्यात आली. पुणे ग्रामीण पोलिसांकडून चेक पोस्टवर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पुण्यात तब्बल 138 कोटींचे सोने पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुण्यातील सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच 02 ईआर 8112 या कंटेनरला तपासणीसाठी थांबवले. तपासणीदरम्यान या पांढर्‍या रंगाच्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या कंटेनरमधील सोन्याची एकूण किंमत 138 कोटी रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. नियमित नाकाबंदीदरम्यान सदर सोन्याचा कंटेनर थांबवून तपासणी करण्यात आली. सहकार नगर परिसरातून ताब्यात घेतलेला हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा असून यामधील सोनं पुण्यातील कुठल्या व्यापार्‍याकडे जात होतं, याचा तपास सध्या सुरू आहे. पोलिसांनी या संदर्भात सगळी माहिती आयकर विभाग तसेच निवडणूक आयोगाला कळवलेली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles