Home राज्य विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं 20 नोव्हेंबरला मतदान

विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजलं 20 नोव्हेंबरला मतदान

0
9

नवी दिल्ली — निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर झारखंडमध्ये 13 आणि 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरलाच निकाल लागणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

आज 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी पत्रकार परिषद घेत असल्याचं निवडणूक आयोगानं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. प्रत्येक निवडणुकीची एक ठरलेली प्रक्रिया असते आणि ही प्रक्रिया कधी सुरू होते, तर निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यावर. निवडणूक आयोगानं विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अर्थात निवडणूक आचारसंहिता लागू होते. आता हे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आचारसंहिता काय असते? अशा आचारसंहितेची गरज काय? यातले नियम काय सांगतात? जाणून घेऊयात.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये किती मतदार आहेत? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार असतील. येथे 5 कोटी पुरुष मतदार आहेत. येथील एक लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर सुमारे 960 मतदार असतील. मुंबईत मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत.

राजीव यांनी सांगितले की झारखंडमध्ये 2 कोटी 60 लाख मतदार आहेत. येथे 1 कोटी 31 लाख पुरुष तर 1 कोटी 29 लाख महिला मतदार आहेत. झारखंडमध्ये 29 हजार 562 बूथवर मतदान होणार आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या किती जागा आहेत?

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी बहुमतासाठी 145 जागा आवश्यक आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54, काँग्रेसला 44 आणि इतरांना 29 जागा मिळाल्या होत्या.

झारखंडमध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत?

झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) 30 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या, तर 26 जागा इतर पक्षांना गेल्या होत्या. निवडणुकीत झामुमो सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता.

मतदानासाठी महत्त्वाच्या घोषणा

जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं यासाठी आपले प्रयत्न राहाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी सांगितलं. सिनिअर सिटिझन्स आणि दिव्यांग व्यक्तींना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेचं व्हिडिओ शुटिंग केलं जाणार आहे. मतदान केंद्राबाहेर जास्त रांग असेल तर मतदारांच्या सुविधेसाठी खुर्च्या ठेवल्या जाणार आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदावारांची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. पैसे, मद्य, ड्रग्स वाटप्यावर कडक नजर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्र दोन किलोमीटरच्या आत असावेत असं सूचना करण्यात आल्या आहेत.

पोटनिवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या

यूपीमध्ये 13 नोव्हेंबरला 9 जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये 20 नोव्हेंबरला विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे.

वायनाडमध्ये 13 नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

पोटनिवडणुकीचा निकालही 23 नोव्हेंबरला लागणार आहे.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये किती मतदार आहेत? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 9 कोटी 63 लाख मतदार असतील. येथे 5 कोटी पुरुष मतदार आहेत. येथील एक लाख मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात प्रत्येक बूथवर सुमारे 960 मतदार असतील. मुंबईत मतदान केंद्र वाढवण्यात आले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here