Friday, November 22, 2024

मराठवाडयात 10 कोटी 10 लाख रूपयांची वीज चोरी उघड

6 कोटी 9 लाख रूपये दंडाची रक्कम वसूल

छ. संभाजीनगर — महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्यामराठवाडयातील आठ जिल्हयात माहे एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या सहा महिन्यात कालावधीत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 2,673 वीज मिटरची तपासणी करण्यात आली. यात 1,451 मिटरमध्ये वीज चोरी आढळून आली. यात 14013697 युनिट वीज चोरी प्रकरणी 10 कोटी 10 लाख रूपयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रक्कमेची आकारणी करण्यात आली आहे. तर 6 कोटी 9 लाख 86 हजार रूपये वसूल करण्यात आले आहेत.व 65 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वीज चोरीची रक्कम लाख रूपयांमध्ये पुढील प्रमाणे
वीज चोरी पथक ग्राहक वीज चोरीची रक्कम
छत्रपती संभाजीनगर शहर 328 229
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 151 150
जालना 199 152
छत्रपती संभाजीनगर 678 531
परिमंडल

बीड 85 59
धाराशिव 115 72
लातूर 219 148
लातूर परिमंडल 419 279

नांदेड 165 88
हिंगोली 76 34
परभणी 113 78
नांदेड परिमंडल 354 200
मराठवाडा एकूण 1451 1010

मराठवाडयातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर,धाराशिव व बीड जिल्हयात एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत भरारी पथक आणि दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागामार्फत वीज चोरांविरूध्द धडक मोहीम राबविली. विघुत कायदा 2003 नुसार कलम 126 अंतर्गत शेजा—याकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुस—या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. तसेच कलम 135 मध्ये मिटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सव्हिेसवायर टॅप करणे व कलम 138 मध्ये महावितरणचे मिटर, वायरसह इतर वस्तु चोरी करणे इत्यादी बाबींचा समावेश होतो. वीज चोरी पकडण्याची मोहीम यापुढेही चालू राहणार आहे. अनधिकृत विजेचा वापर करू नये. अनधिकृतपणे विजेचा वापर करतांना आढळून आल्यास विघुत कायदयानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
आगामी काळात वीज चोराच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वीज चोरी शोध मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणचे प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles