Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — बीड जिल्हा कारागृहातील कथित मारहाण प्रकरणाला आता मोठा नवा ट्विस्ट मिळाला आहे. आधी वाल्मिक कराड गँगमधील सुदर्शन घुले याच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या कैदी अजहर पठाण याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.त्यानेच आता यु टर्न घेतला असून . “माझ्यावर दबाव टाकून खोटी माहिती द्यायला लावली,” असा गंभीर दावा त्याने केला आहे. सोबतच मस्साजोगच्या निवडणुकीसाठी हे सगळे आरोप करायला लावले, असे त्याने सांगितले.
बीड जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ६ मध्ये अजहर पठाण आणि प्रतीक घुले यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता. सुरुवातीला या वादाचे रूपांतर मारहाणीमध्ये झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

आता अजहर पठाण यानेच याबाबत वेगळा खुलासा करत म्हटले आहे की जेलमधील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर दबाव टाकला पोलीस कर्मचारी दीपक पाटील, सनी आठवले आणि साईनाथ परभणी यांनी धमकावल्याचा आरोप करत बाहेर फोन करून ठराविक पद्धतीने बोलण्यास भाग पाडले“वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगची बदनामी करा” असा संदेश देण्यात भाग पाडल्याचं त्याने सांगितलं.
अजहर पठाणने मस्साजोग येथील सरपंच पदाच्या निवडणुकीशी हे प्रकरण जोडले गेले आहे.मतदानाच्या पार्श्वभूमीवर कराड गँगची बदनामी करण्यासाठीचा कट दादा खिंडकर यांच्या निरोपावरून रचला गेला असल्याचे व मतदानापर्यंत सुरू ठेवण्याचे सांगण्यात आले होते.निवडणूक होईपर्यंत हे प्रकरण वाढवण्याचा दबाव
अजहर पठाणने या संदर्भात जेल प्रशासनाला लेखी तक्रार दिली असून त्यात स्पष्ट नमूद केले आहे की:“मी दबावाखाली खोटी माहिती दिली. मला माफ करा.”तसेच, प्रतीक घुलेसोबतचा वाद आपसात मिटल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.या नव्या खुलाशामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.कारागृहातच दबाव टाकला गेला का?निवडणुकीसाठी खोटी कथा रचली गेली का?संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता असून, प्रशासनाची भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे