Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

बीड — जेष्ठ पत्रकार महेश वाघमारे यांच्या मातोश्री श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे वय 88 वर्ष यांचे आज बीड येथील निवासस्थानी दि 14 रोजी पहाटे 4 वाजता निधन झाले त्याचा अत्यंविधी आज 5 वाजता अमर धाम मोंढा रोड,बीड येथे करण्यात आला
श्रीमती मालतीबाई माधवराव वाघमारे या मूळ रा अंबड येथील असून त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना नातवंडे असा परिवार आहे,
जुन्या पिढीतील धार्मिक वृत्तीच्या श्रीमती मालतीबाई वाघमारे अंबड मध्ये मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून परिचित आहेत,
काही महिन्यापूर्वीच मोठे चिरंजीव प्रसिद्ध निवेदक स्व मंगेश वाघमारे यांचे निधन झाले,त्यांनतर त्या बीड येथे पत्रकार महेश वाघमारे यांच्या निवासस्थानी राहत होत्या,आज अचानक पहाटेच त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अंत्यविधीला समाजातील विविध स्तरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघमारे कुटुंबियांच्या दुःखात “सह्याद्री माझा ” परिवार सहभागी आहे