Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

केज (बीड ) — जिल्ह्यातील केज पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 7 लाख 81 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, केज येथे कर्तव्यावर असताना21 मे रोजी वेंकटराम (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांना गोपनीय माहितीदारामार्फत केज पोलीस ठाणे हद्दीतील काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. संबंधितांकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व साहित्य असल्याचेही समोर आले होते.
मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी तातडीने पोलीस पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष दुपारी छापा टाकून तिरट जुगार खेळणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले.
या धाडसी कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी तसेच चारचाकी वाहन असा एकूण अंदाजे 7 लाख 81 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. वेंकटराम (IPS) सहाय्यक पोलीस अधीक्षक, उपविभाग केज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इनामदार, पोलीस हवालदार क्षीरसागर, पोलीस हवालदार मोरे, पोलीस हवालदार वंजारे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत. तपासाच्या दृष्टीने आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.