चौसाळाचे माजी आ.स्व. चांदमल लोढा यांच्या पत्नी मदनबाई लोढा संथारा व्रतात कालवश

Spread the love

प्रेमचंद, दिलीप, अशोक लोढा यांना मातृशोक

बीड —  पूर्वीच्या चौसाळा मतदार संघाचे आमदार स्व. चांदमल लोढा यांच्या धर्मपत्नी श्रीमती मदनबाई चांदमल लोढा यांना ३ मार्च मंगळवार रोजी रात्री साडेआठ वाजेदरम्यान संथारा व्रतामध्ये वीरमरण प्राप्त झाले. मृत्यू समयी त्या 89 वर्षाच्या होत्या.

श्रीमती मदनबाई लोढा आहे यांच्या पार्थिवावर ४ मार्च बुधवारी मोंढा रोडवरील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 10:30 वाजता त्यांची डोली जालना रोडवरील गणेश हाउसिंग सोसायटीतील अशोक लोढा यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.दिवंगत मदनबाई लोढा यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी (पुष्पा संदीप भंडारी, पुणे), सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद (बाबुशेठ) लोढा, स्व. सतीश लोढा, दिलीपचंद लोढा, भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा यांच्या त्या मातोश्री होत. लोढा कुटुंबीयांच्या दुःखात “सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *