बीड अपघात : नेकनूरजवळील येळंबघाट शिवारात एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
बीड — नेकनूरजवळील येळंबघाट शिवारात एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी (२५ ऑक्टोबर) सायंकाळी सुमारे ७.०५ ते ७.१५ वाजण्याच्या दरम्यान अहमदपूर- अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डी वर हा भीषण अपघात झाला. यामध्ये दोन दुचाकी स्वारांचा जागीच मृत्यू झाला
बीड अपघात मध्ये राहुल सुरेश काळे (वय २५, रा. येळंबघाट) आणि आकाश बापू पवार (वय २५, रा. विडा, ता. केज) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
नेकनूरकडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बसची धडक
बीड अपघात बद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वसई-अंबाजोगाई एसटी बस (क्रमांक MH-14-MH-5632) नेकनूरहून अंबाजोगाईच्या दिशेने जात होती. त्याचवेळी यामाहा एफझेड दुचाकी (क्रमांक MH-02-BL-0753) केज रोडने नेकनूरच्या दिशेने येत होती. येळंबघाट शिवारात दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात
बीड अपघात ची माहिती मिळाल्यानंतर दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय, नेकनूर येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त एसटी बस आणि दुचाकी नेकनूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. एसटी बसचे चालक रमेश गायकवाड (रा. पाली, ता. जि. बीड) हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू
या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नेकनूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अपघाताची परिस्थिती आणि कारणांचा शोध घेण्यासाठी पुढील चौकशी व कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. अशी माहिती नेकनूर पोलिसांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील इतर ताज्या बातम्या वाचण्यासाठी बीड न्यूज विभाग पहा.
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या अधिकृत माहितीसाठी MSRTC Official Website ला भेट द्या आणि राष्ट्रीय महामार्ग 548-D च्या मार्गासाठी NH-548D Map पहा.