बीड : १२ दिवसांच्या बाळाला ठेवून महिलेची कंकालेश्वर कुंडात उडी, मृत्यू

बीड  — बीड शहरातील ऐतिहासिक कंकालेश्वर मंदिर परिसरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. १२ दिवसांच्या नवजात बाळाला घरी ठेवून एका महिलेने मंदिर परिसरातील कुंडात उडी घेतल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी आनंद सोळुंके (वय ३९) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या पिंपळगाव कोलते येथील रहिवासी असून सध्या बीड शहरातील साई पार्क अपार्टमेंट येथे माहेरी मुक्कामी आल्या होत्या.
बुधवारी सकाळी त्यांनी कंकालेश्वर मंदिर परिसरातील कुंडात उडी घेतल्याची माहिती समोर आली. घटनेची खबर मिळताच पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह कुंडातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईक आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महिलेने हे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.
या घटनेने विशेषतः नवजात बाळाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles