Home क्राईम नात्याला काळीमा : 60 वर्षीय आजोबा आणि चुलत भावाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

नात्याला काळीमा : 60 वर्षीय आजोबा आणि चुलत भावाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार 

0
15

नेकनूर — आजोबा – नात, भाऊ- बहीण या नात्याला काळीमा फासणारी घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात घडली. साठ वर्षीय आजोबाने पंधरा वर्षाच्या अल्पवयींन नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. हे कमी की काय म्हणून पिडीतेचा चुलत भाऊ देखील मुलीवर वारंवार अत्याचार करत असल्याची बाब समोर आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी आजोबा व चुलत भाऊ यांच्यावर पोक्सो ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एका गावात आजोबा आज्जी सोबत राहणाऱ्या पंधरा वर्षाच्या मुलीचे आई-वडील बाहेरगावी कामाला निघून गेलेले आहेत. सध्या शाळेला सुट्ट्या असल्याने आज्जी आणि इतर भावंडे शेतात शेळ्या चारण्यासाठी निघून गेले. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून आजोबांनी ती जेवण करत असतानाच तिला बळजबरीने ओढून नेले  तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना घडल्यानंतर दोन चार दिवसांनी पोटात दुखू लागल्याने हॉस्पिटल मध्ये गोळ्या औषधं घेतली पण फरक पडला नाही. पुन्हा डॉक्टर कडे गेल्यावर महिला डॉक्टरांनी विश्वासात घेऊन विचारल्यावर पिडीतेने आपबीती सांगितली. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. याप्रकरणी.नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक म्हणजे पीडिता शेळ्या चरण्यासाठी गेली असता. तिचा चुलत भाऊ हा शेळ्या चारण्यासाठी पीडीता गेल्यानंतर  शेतामध्ये जबरदस्ती लैंगिक संबंध ठेवत होता.असा उल्लेख देखील तक्रारीत करण्यात आला आहे. हा प्रकार  फक्त तिच्या एकटी सोबतच झाला नाही तर इतर लहान बहिणी सोबतही चुलत भाऊ असाच अत्याचार करत होता असा देखील तक्रारीत उल्लेख आहे. चुलत भावाने घरात कोणीही नाही अस पाहून एका दिवशी बळजबरीने अत्याचार केला. त्यामुळे आजोबा आणि चुलतभावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here