Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124
Physical Address
304 North Cardinal St.
Dorchester Center, MA 02124

मुंबई — राज्य सरकारने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी मोठा प्रशासकीय निर्णय घेत 21 आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल झाले असून अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून अलीकडच्या काळात पोलीस विभागात सातत्याने बदल्या होत असल्याचे दिसत आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक (SP), उप आयुक्त (DCP) तसेच अपर पोलीस महासंचालक (ADG) स्तरावरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

🏀 जय के. बन्सल → सायबर सुरक्षा, महाराष्ट्र
🏀 ससगुरी विशाल आनंद → धुळे
🏀 बाळासाहेब पाटील → DCP, मुंबई
🏀 सोमनाथ घागे → पोलीस महासंचालक कार्यालय
🏀 रविंद्रसिंह परदेशी → राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
🏀 संदीप घुगे → DCP, मुंबई
🏀 श्रवण दत्त → ADG विशेष कृती (स्टाफ ऑफिसर)
🏀 मुम्मका सुदर्शन → अहिल्यानगर
🏀 बोडोंपत स्वामी → नाशिक ग्रामीण
🏀 अनुज तारे → अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, पुणे
🏀 अनुराग जैन → DCP, मुंबई
🏀. अश्विनी सानप → नंदुरबार
🏀. तेगबीर संधू → जालना
🏀. राजकुमार शिंदे → लोहमार्ग, पुणे
🏀. निखिल खाटमोडे → वाशिम
🏀 आयुष नोपानी → चंद्रपूर
🏀 पंकज कुमावत → परभणी
🕳️. नितीन कदम → अमरावती ग्रामीण
🕳️. सूरज गुंजाळ → मालेगाव
🏀. गजानन राजमाने → DCP, मुंबई
🕳️. दत्ता तोटेवाड → अमरावती
सरकारने सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या पदावर रुजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बदल्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.