नवी दिल्ली — देशभरात सध्या तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) सुरू असताना नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फाॅरकास्ट (European Centre for Medium-Range Weather Forecasts) (ECMWF) च्या ताज्या अहवालानुसार, 2026 मध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून भारतात ठरलेल्या वेळेपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मान्सून कधी येणार?
ईसीएमडब्ल्यू एफ च्या अहवालानुसारअंदमान-निकोबार बेटांवर: 18 ते 25 मे दरम्यान तर केरळ (Kerala) मध्ये: 25 मेच्या आसपास मान्सूनचे आगमन होणार आहे त्यानंतर मान्सून हळूहळू संपूर्ण भारतभर पसरत उत्तर भारताकडे सरकणारयामुळे मे अखेरीसच देशातील अनेक भागांमध्ये पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मान्सून लवकर येण्यामागची कारणे
हवामान तज्ज्ञांच्या मते अल निनो (El Niño) ची परिस्थिती कमकुवत राहण्याची शक्यता असल्याने पॉझिटिव्ह इंडियन डायपोल (indian Ocean Dipole (Positive IOD) सक्रिय होण्याची चिन्हे या दोन्ही घटकांमुळे भारतात पाऊस लवकर सुरू होण्याची शक्यता वाढली आहे.
IMD चा इशारा: पाऊस कमी पडू शकतो
जरी मान्सून लवकर येणार असला, तरी भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) (IMD) ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 चा पावसाळा पूर्णपणे समाधानकारक असेलच असे नाही. जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीच्या LPA च्या 90% ते 95% पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे.काही राज्यांमध्ये कमी पावसामुळे शेतीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

