Home राज्य लालपरी’ला नवं ग्लॅमर! रितेश देशमुख आणि जेनेलिया बनले एसटीचे ब्रँड ॲम्बेसिडर

लालपरी’ला नवं ग्लॅमर! रितेश देशमुख आणि जेनेलिया बनले एसटीचे ब्रँड ॲम्बेसिडर

0
9

मुंबई — महाराष्ट्रातील जनतेची जीवनरेखा असलेल्या ‘लालपरी’ म्हणजेच Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) ला आता नवं ग्लॅमर मिळणार आहे. मराठमोळे लोकप्रिय कलाकार रितेश देशमुख (Riteish Deshmukh )आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh )यांची एसटी महामंडळाच्या ब्रँड ॲम्बेसिडर (सदिच्छा दूत) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी मोठा निर्णय

प्रवाशांनी अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी व्हावे, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण ते शहरी भागांपर्यंत एसटी सेवा अधिक आकर्षक आणि प्रभावी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

मंत्रालयात पार पडला नियुक्ती सोहळा

22 एप्रिल 2026 रोजी मंत्रालयात झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )यांच्या हस्ते या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे ( Eknath Shinde, )परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. जाहिराती, मोहिमा आणि जनजागृती रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबत 5 हा वर्षांचा करार होणार आहे
🕳️ एसटीच्या जाहिराती आणि प्रचार मोहिमांमध्ये सहभाग
🕳️ सामाजिक उपक्रम आणि जनजागृती कार्यक्रमात सक्रिय भूमिका
‘🕳️ रस्ता सुरक्षा अभियान’ अधिक प्रभावी करण्यावर भर
🕳️  या माध्यमातून प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवास, नियमांचे पालन आणि सार्वजनिक वाहतुकीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.एसटी महामंडळाच्या विविध जनजागृती मोहिमांना अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या दोन्ही कलाकारांचा वापर केला जाणार आहे. विशेषत यामध्ये रस्ता सुरक्षा सामाजिक संदेशांचा प्रसार केला जाणार आहे.

एस टी महामंडळाकडे 16 हजारहून अधिक बसेस चा ताफा आहे. 86 हजाराहून अधिक कर्मचारी काम करतात तर 55 लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात.देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक रस्ते वाहतूक संस्थांपैकी एक असलेल्या MSRTC साठी ही नियुक्ती महत्त्वाची मानली जाते.

यापूर्वी मराठी चित्रपट सृष्टीचे अभिनेते मकरंद अनासपुरे यांची 2023 मध्ये तर त्यापूर्वी विक्रम गोखले यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here