बीड — Kej Newsविविध गुन्ह्यांचा तपास जलद गतीने व्हावा या उद्देशाने केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी विशेष पथकाची 16 एप्रिल रोजी स्थापना केली. दुसऱ्याच दिवशी मस्साजोग शिवारात पोलिसांनी पत्र्याच्या शेडमध्ये विक्रीसाठी ठेवलेला नऊ लाखाचा गुटखाGutkha Raid जप्त केला आहे.
केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी गंभीर गुन्हे खून खुनाचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी मकोका. (Maharashtra Crime) यासारख्या दाखल गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून अटक करण्याच्या उद्देशाने पोलीस उपनिरीक्षक ए जी इनामदार, धारूर पो.स्टे. चे डी वाय मोरे, केज मधील आर आर वंजारे, नेकनूर चे व्ही ए क्षीरसागर यांचे पथक 16 एप्रिल रोजी स्थापन केले. हे पथक स्थानिक गुन्हे शाखेशी समन्वय साधून काम करणार आहे. दरम्यान सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांना मसाजोग येथे रंजीत बाजीराव देशमुख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये रोहित आसाराम देशमुख यांनी प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली. माहिती मिळताच तात्काळ कारवाई करून दुपारी दोनच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार,पो.उप नि. कराडकर आणि त्यांच्या पथकाने छापा मारून शेडची झाडाझडती घेतली. यावेळी निळ्या पांढऱ्या गुलाबी रंगाच्या पोत्यांमध्ये प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा आणि पान मसाला मिळून आला. या कारवाईत तब्बल नऊ लाखाचा गुटखा जप्त( Gutkha Seized) करण्यात आला
याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गुटखा तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात आहेत याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

