Home राज्य महाराष्ट्रात पुन्हा भूकंपाचे धक्के! मराठवाड्यानंतर चंद्रपूर हादरलं; 3.4 रिश्टरची नोंद

महाराष्ट्रात पुन्हा भूकंपाचे धक्के! मराठवाड्यानंतर चंद्रपूर हादरलं; 3.4 रिश्टरची नोंद

0
9

चंद्रपूर — महाराष्ट्रात आज (11 एप्रिल) भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची मालिका सुरूच असून, सकाळी मराठवाड्यात हादरे जाणवल्यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यातही भूकंपाची नोंद झाली आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रपूरमध्ये दुपारी भूकंप

National Center for Seismology (NCS) च्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना खुर्द येथे दुपारी 4 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता
तीव्रता: 3.4 रिश्टर स्केल इतकी होती. गडचांदूर आणि राजोरा दरम्यान हरदोना खुर्द गावामध्ये जमिनीखाली दहा किलोमीटर अंतरावर केंद्रबिंदू होता.हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

🌍 सकाळी मराठवाड्यातही हादरे

आज सकाळी सुमारे 8:46 वाजता मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.परभणी,हिंगोली,नांदेड तसेच विदर्भातील यवतमाळ वाशिम
या भागांमध्येही सौम्य धक्के जाणवले.

 हिंगोलीत अधिक तीव्र भूकंप

हिंगोली जिल्ह्यातील पांग्रा शिंदे परिसरात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला.
MGM APJ Abdul Kalam Astro Space Science Center चे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भाग आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. दरम्यान
गेल्या काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात भूगर्भातून गूढ आवाज येणे आणि लहान-मोठे धक्के जाणवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here